Saturday, 12 August 2017

हर्ले/ वार्ताहर दि. १२/ ८/१७

      गणेश उत्सव मंडळांनी डॉल्बीस फाटा देत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून गणेश उत्सव साजरा करावा. असे आवाहन शिरोली पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी केले.                              
   ते मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमिवर तरूण मंडळांच्या कार्यकर्त्याच्या बैठकीप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सतिश चौगुले ,प्रमुख उपस्थिती पोलीस पाटील अमिर हजारी होते.
            सपोनि परशुराम कांबळे पुढे म्हणाले की, कोणीही डॉल्बी लावू नये. देखावे समाज प्रबोधनपर असावेत. स्टेज हे वाहतुकीस अडथळा होणार नाही असे घालावेत. उत्सवाच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश दिला जावा.डॉल्बी मुक्त उत्सव साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासन क्रियाशील आहे. तरूण मंडळांनी या उपक्रमास प्रतिसाद देणे क्रमप्राप्त  आहे. मंडळांनी ध्वनिक्षेपक दिलेल्या मर्यादित राहून वापर करावा. असे आवाहन करण्यात आले.या प्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधत त्यांनी चर्चेस योग्य मार्गदर्शन केले.
         याप्रसंगी महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा गबाले, महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा नारायणकर,प्रताप रजपूत, बाळासाहेब थोरवत, प्रकाश कांबरे,अविनाश पाटील, अविनाश कांबळे, धर्मेंद्र चौगुले आदी मान्यवरासह, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येंनी उपस्थित होते.

      फोटो - मौजे वडगाव येथे सपोनि परशुराम कांबळे यांचा सत्कार करतांना सरपंच सतिश चौगुले व इतर मान्यवर

Friday, 11 August 2017

कोल्हापूर प्रतिनिधी संदीप पोवार
11/8/2017

कसबा बावडा कोल्हापूर येथील
रिलॅक्स मित्र मंडळच्या वर्गणी पुस्तक पुजन प्रसंगी दरवर्षी प्रमाणे  डाॅल्बीला फाटा देत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आज संकष्टीचे औचित्य साधून मंडळातील कार्यकर्त्यांनी वर्गणी पुस्तक पुजन चा कार्यक्रम पार पाडला.
यावेळी   जेष्ठ नागरिक नगरसेवक पापा सालपे, नामदेव पाटील, अनिल घराळ, आनंदराव कुंभार (सर),बाळासाहेब पाटील, साताप्पा पाटील, शामराव पाटील राहुल पाटील संदीप पाटील  उपस्थितीत होते
नगरसेवक पापा सालपे यांनी मंडळातील कार्यकर्त्यांना डाॅल्बी न लावता गणेशोत्सव हा विधायक उपक्रम करून संपन्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोल्हापूर प्रतिनिधी - सर्जेराव पोवार
मिरज - कोल्हापूर एस.टी.बस कोल्हापूर बस स्थानकाकडे जात असताना आज मुक्तसैनिक वसाहत मेन रोड चौकात एसटी बसचा ब्रेक फेल होऊन अपघात झाला. या मिरज-कोल्हापुर बस मध्ये 23 प्रवासी होते, एसटी बस ड्रायव्हर ला ब्रेक न लागलेल्याने समोरच्या कार ला  धडक देत डिव्हाईडवर चढली व  थांबली त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून अपघातात कोणही जखमी नाहीत.

Thursday, 10 August 2017

कुरळप  वार्ताहर दिलीप मोहिते

,,कुरळप येलूर शिवेवर  संजय मोहिते यांच्या शेताच्या बांधावरील  चंदनाचे  झाड अज्ञात व्यक्तीने  तोडून शेंडा  व बुडका याच्या  मधला खोडाचा भाग चोरून नेण्यात  आला आहे. गेल्या  दोन चार  महिन्यापूर्वी  सुद्धा ओढ्यातील  झाडे चोरून नेली होती. चंदनाच्या खोडातील गाभ्यापासुन तेल निघते त्याला लाखो रुपये लिटरची किंमत आहे हे चोरांना माहिती आहे त्यामुळे असे चंदनाचे झाड तोडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे.

नाशिक : बेशिस्त, निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल दिगंबर बडगुजर यांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी निलंबित केले आहे़ मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी असताना अनेक गुन्ह्यांच्या तपासात बेशिस्तपणा केल्याचा ठपका बडगुजर यांच्यावर ठेवण्यात आला आहे़ पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्याकडे २०१६ मध्ये मालेगाव तालुका पोलीस ठाण्याची जबाबदारी होती़ या कालावधीतील गुन्ह्यातील स्त्री अत्याचाराचा तपास पोलीस उपनिरीक्षकाकडे देण्याऐवजी सहायक उपनिरीक्षक व नंतर पोलीस नाईक यांच्याकडे देऊन निष्काळजीपणा केला़ याबाबत बडगुजर यांच्याकडे कारणमीमांसेची विचारणा केली असता ती समाधानकारक नसल्याचेही चौकशीत समोर आले़

Tuesday, 8 August 2017

कोल्हापूर प्रतिनिधी
सोनतळी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेवरील टाकण्यात आलेल्या दरोड्यातील ६१ लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला आहे. या प्रकरणी मच्छीन्द्र विलास बनसोडे (वय ३०, रा. गणेशवाडी, रेठरे बुद्रुक ता. कराड), संतोष सुग्रीव खुर्द (वय ३५, रा. देगांव, ता. पंढरपूर), इरफान अजीज बेग (वय ४०, रा. वासदुर्गा, कर्नाटक) यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि शहर उप अधीक्षक प्रशांत अमृतकर उपस्थित होते. सुरक्षारक्षकांना बेदम मारहाण करून त्यांचे हात-पाय बांधून दरोडेखोरांनी येथे ठेवण्यात आलेले १०० किलो चंदन तेल आणि चंदनाचे लाकूड लंपास केले होते. ते त्यांनी कोबीच्या व कांद्याच्या मालाखाली कराडमधील चोरलेल्या एका टेंपो मध्ये लपवून नेला जात असताना पोलिसांनी तो टेम्पो मालासह पकडला. पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, दिलीप जाधव यांचेसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने बनसोडे, खुर्द, बेग यांना अटक करून त्यांच्याकडून १०० किलो चंदन तेल व ६४ किलोचे चंदनाचे लहान मोठे तुकडे असा एकूण ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.

Sunday, 6 August 2017

कुरळप वार्ताहर - दिलीप मोहिते                 

सौ.अनिता संजय सुतार वय 27 रा ,निलेवाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार ठाणापुढे तालुका वाळवा ही शुक्रवार दि .4/8/2017.रोजी दुपारी 3.30.वाजता वडील दिनकर विष्णू लोहार यांच्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेली आहे अशी तक्रार दिनकर विष्णू लोहार यांनी कुरळप पोलीस ठाण्यात दिली.पुढील तपास कुरळप पोलीस ठाण्याचे ए स आय सुरेश कांबळे करीत आहेत.